Posts

भटकंती भोर परिसरातल्या अपरिचित ऐतिहासिक ठिकाणांची...

Image
भटकंती भोर परिसरातल्या अपरिचित ऐतिहासिक ठिकाणांची... सर्वसामान्य मनुष्याला नाविन्याची ओढ असते आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यात मला ती जरा जास्तच आहे. म्हणून शुक्रवारच्या सुटीचा दिवस वाया न घालवता काही नवीन ठिकाणं पाहण्यात घालवावा , असं मी आणि माझा ट्रेकींगमधला नेहमीचाच जोडीदार रघुनी ठरवलं खरं! पण जावं कुठं हेच ठरत नव्हतं. फेसबुकवर ' कोयाजी बांदल ' स्मारकाबद्दल वाचल्याचं स्मरलं आणि प्रश्न चटकन सुटला. ठिकाण ठरलं ' भोर आणि परिसर ' काही मी तर काही रघुनं न पाहिलेली ठिकाणं ठरविली , मनातल्या मनात ठिकाणांचा क्रम ठरविला आणि सकाळी लवकरच चिंचवड सोडलं. आमचं पहिलं ठिकाण होतं चेलाडीचा ' कोस-मिनार '. भोरचे संस्थानिक श्रीमंत रघुनाथराव पंडित पंतसचिवांनी शके १८६७ साली या मिनाराची उभारणी केली आहे. हा मिनार त्याच्या असलेल्या ठिकाणापासुन आजुबाजुच्या किल्यांच्या दिशा अंतरासह दर्शवितो. राष्ट्रीय महामार्गालगत आणि चेलाडीच्या चौकात असुनसुध्दा या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल कोणालाही सोयरसुतक नव्हतं ना कोणी याची स्वच्छता ठेवतंय. पुर्वी याच्यावरील अंतराच्या खुणा दगडावर कोरलेल्या...